Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

मोबाइल चोरीमुळे नातं उद्ध्वस्त; चोराने फॅमिली ग्रुपवर शेअर केले महिलेचे अश्लील फोटो


 

ग्वाल्हेर, 10 जुलै : मोबाइल चोरीच्या (Mobile Stolen) घटना काही नवीन नाहीत. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्याचे आपण पाहतो, वाचतो. ग्वाल्हेरमध्ये (Gwalior) घडलेल्या मोबाइल चोरीच्या घटनेमुळे एका महिलेचं कौटुंबिक जीवन (Family Life) धोक्यात आलं आहे. ग्वाल्हेरच्या एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सचा (Nurse) मोबाइल चोरीला गेला. या मोबाइलमधून नर्सचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ (Adult Photo And Video) चोरट्याने तिच्या फॅमिली ग्रुप्सवर शेअर केले. त्यात हॉस्पिटलचा एक कर्मचारीही दिसत आहे. हा मोबाइल चोरल्यानंतर चोराने (Thief) या नर्सच्या नवऱ्याला फोन करून हे सांगून फोटो शेअर केले. यामुळे ही नर्स चांगलीच अडचणीत आली आहे. दरम्यान, हे फोटो एडिट करून टाकण्यात आले असल्याचा दावा संबंधित नर्सने केला आहे. दैनिक भास्करने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

नर्सने बदनामीबाबत आणि आरोपी ब्लॅकमेल (Blackmail) करत असल्याची तक्रार महाराजापुरा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनीदेखील ही तक्रार दाखल करून घेतली. हॉस्पिटलमधल्या पंकज या कर्मचाऱ्यावर याबाबत संशय व्यक्त केला जात आहे; मात्र तो अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, ग्वाल्हेर शहरातल्या आदित्य पुरम येथील 28 वर्षीय महिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. या महिलेचं कौटुंबिक आयुष्य सुरळीत चाललं होते; मात्र एके दिवशी अचानक तिचा मोबाइल चोरीला गेला. 2 मे रोजी रुग्णावर उपचार करत असताना ही घटना घडली. तिने मोबाइल शोधण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तो सापडला नाही. या मोबाइलमध्ये फॅमिली फोटोंसह नर्सचे काही वादग्रस्त फोटो आणि व्हिडीओदेखील होते, असं आरोपीने संबंधित नर्सच्या पतीला फोन करून सांगितलं.

मोबाइल चोरणाऱ्याने फॅमिली ग्रुपवर या नर्सचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. त्यामुळे साहजिकच तिची बदनामी झाली. या नर्सच्या पतीला अनेक नातेवाईकांचे फोन आले. यामुळे घरात भांडणं सुरू झाली. नाती उद्ध्वस्त झाली. हे फोटो एडिट (Edit) करून टाकल्याचा दावा या महिलेने केला आहे. याबाबतची तक्रार महाराजपुरा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

आरोपीने प्रथम या नर्सच्या मोबाइलवरून तिच्या पतीला फोन केला. कॉल करणाऱ्या व्यक्तीनं त्याला सांगितलं, की 'या मोबाइलमध्ये तुमच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ आहेत. यात ती तिच्या सहकाऱ्यासोबत दिसत आहे. मी हे व्हायरल (Viral) करणार आहे.' त्यानंतर काही वेळातच आरोपीने नर्सच्या मोबाइलवरून तिच्या फॅमिली ग्रुपवरील (Family Group) जे क्रमांक आजी, जिजाजी किंवा आत्या आदी नातेवाईकांच्या नावाने सेव्ह होते त्यावर हे फोटो आणि व्हिडीओ पाठवून दिले.

Post a Comment

0 Comments